PATEL 82 NEWS
जिल्हा पुरवठा यंत्रणा सडली अधिकाऱ्याचे डोळे झाले आंधळे आणि कान बहिरे झाले....
गरीबाच्या तोंडातील घास व्यापाऱ्याच्या घशात बीड जिल्हा रेशनच्या काळाबाजार जोमात जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालावे.. गोरगरिबांना स्वस्तात धान्य पुरवठा व्हावा त्यांची खाण्याची मूलभूत गरज भागावी या उदात हेतूने शासनाकडून धान्य आणि इतर पदार्थ वस्तू पुरविल्या जातात यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे यावर देखरेखीचे काम जिल्ह्याची पुरवठा यंत्रणा करीत असते सध्या स्थितीत बीड जिल्ह्याची पुरवठा यंत्रणा स्पेशल झोपलेली दिसून येते असे असून ती खालपासून वरपर्यंत सोडली आहे गरीबाच्या तोंडातला घास काढून व्यापाराच्या घशात घातला जात असताना जिल्हा पुरवठा अधिकारी मात्र अंध आणि बहिरे झाले आहेत ते खरंच आणि भिन्न आहेत की काय या सगळ्या प्रकाराला पुरवठा अधिकारी यांचे पाठबळ आहे याबाबत जनतेत उलट सुलट चर्चा होत आहे शासनाकडून अंत्योदय ऋसारख्या योजनेस शिधापत्रिका धारक लाभार्थी आश्रम शाळा आणि ठिकाणी धान्य वितरित केला जातो हे धान्य ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय गोदाम आहेत या गोदामात गहू तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू ठेवल्या जातात या गोदामात आलेल्या धान्याचे विवरण आणि आवक जावक याची नोंद ठेवल्या जातात या नोंदी मधून धान्याचा काळाबाजार करण्यासाठी चटावलेले पीपासु मलिदा लागतात शासनाने दिलेले धान्य आणि गोदामात रेकॉर्ड मध्ये असलेले धान्य याच्या नोंदी सारख्या ठेवून आणि त्यातूनच पळवाट काढीत कोट्यावधी रुपयाचा धान्यावर डल्ला मारला जातो आहे सरकारी गोदाम मधून दुकानाकडे निघालेला माल अनेकदा मधल्या मध्येच गायब केला जातो गोदाम कर्मचारी आणि रेशनिंग अधिकारी मालपुरवठा करणारे वाहन चालक शिवाय रेशनिंग दुकान मालक याचे एकमेकांशी लागेबांधे निर्माण झाले आहे त्यातूनच मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार होतोय गोरगरीब आणि मध्येवरगियासाठी सरकारने कमी दरात उपलब्ध करून दिलेले धान्य व्यापाराच्या घशात घातले जाते रेशनिंग दुकानाचे मालक खोटे बिले सादर करून लोकांना धान्य वाटल्याचे नाटकेही सफाईने वटवतात त्याला गोदाम कर्मचारी व पुरवठा यंत्रणेतील अधिकारी सरक्षित करतात अर्थात सगळेच असे करतात असे नाही मात्र या गोरख धंद्यात मोठी साखळी निर्माण झालेली आहे या सगळ्या प्रकरणात जे या यंत्रणेचे बॉस आहेत असे जिल्हा पुरवठा अधिकारी नेमक काय करतात त्यांना या गोष्टी माहीत नसतील का आणि या सर्व गोष्टी माहितअसतील तर गप्प का आहे हा गडबड घोटाळा सुरू असताना कारवाई तर कुठे झालेली दिसत नाही या धान्याच्या काळ्या बाजारात काही खाजगी मंडळी ही सक्रिय आहेत वरून वरून हा प्रकार किरकोळ वाटतो परंतु यातूनच कोटीवधीची उलाढाल होत आहे.