शैक्षणिक कालखंड पडलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ द्यावा.
अकोला:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने केली आहे, इयत्ता अकरावी, बारावी आणि त्या नंतरच्या व्यवसायीक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा आधार मिळतो, या योजनेत पात्र होण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत काही अटी दिलेल्या आहेत ,जसे की विद्यार्थ्यांना दहावी ,बारावी पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्के त्यापेक्षा जास्त गुण अनिवार्य असणे, तसेच विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसणे, यासह अनेक अटी लावून दिले आहेत, या अटींची पूर्तता असणे ही सगळ्या विद्यार्थ्यांची संमती आहे, परंतु या विभागाने शिक्षणात कालखंड पडलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे, वास्तविकता विद्यार्थी हे मुद्दाम शिक्षणामध्ये कालखंड ठेवत नसतात, त्यांच्या काही अडचणी असतात, जसे की, वैद्यकीय कारण ,आर्थिक परिस्थिती नसणे, महाविद्यालयात तांत्रिक बाबींमुळे प्रवेश न मिळणे, अशा अनेक बाबी असतात, असे महत्वाचे ठोस कारणे असताना अश्या कालखंड पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेपासून वंचित ठेवणे योग्य नाही , ही जाचक अट रद्द करावी या संदर्भाचे निवेदन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे अकोला जिल्हा अध्यक्ष आकाश जंजाळ यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांच्या नेतृत्वात तसेच राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अर्शद कच्छी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अंसार पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष इम्रान मिर्झा, प्रदेश युथ विभाग अध्यक्ष नदीम बेग यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे महाराष्ट्र राज्याचे मा. सचिव यांना ईमेल द्वारे निवेदन पाठून यासंदर्भात मागणी केली आहे, यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अझीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रशिश खंडारे, तालुका अध्यक्ष राहुल खाडे, अकोला तालुका अध्यक्ष रोशन धांडे, उपस्थित होते.