आर टीई प्रवेश प्रक्रिये पासून गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचे शिक्षण विभागाचे धोरण...
बीड गोरगरिबाचे मुले देखील सधन युक्तीच्या मुलाप्रमाणे मोठ्या इंग्रजी शाळेत शिकावेत आणि शिक्षणातील विषमता दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारने राईट टू एज्युकेशन बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार हा कायदा अमलात आणला या कायद्याअंतर्गत विनाअनुदानित तत्व वरील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के जागा मोफत प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र मागील काही वर्षापासून राज्य शिक्षण विभागाच्या या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे परिणामी या कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या लाभा पासून अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप प शिवसंग्राम चे युवा नेते तथा आरटीई प्रवेश प्रक्रिया ही डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येते नोंदणीसाठी महिनाभर वेळ दिल्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुभा दिला जाते जेणेकरून जेव्हा जून महिन्यात शाळा सुरू होतील तेव्हा आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोईस्कर प्रवेश मिळेल मात्र यंदा फेब्रुवारी महिना शरद आला असला तरी आणखी राज्य शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया साठी वेबसाईट सुरू केली नाही परिणामी हे प्रक्रिया जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार नसून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश पासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे गतवर्षी राज्यभरात 39 हजार प्रवेश होऊ शकले नाहीत तर जिल्ह्यात 575 प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या होत्या हे शिक्षण विभागाचे अपयशच म्हणावे लागेल यावर्षी तर ही प्रवेश प्रक्रिया कमलाची रखडली आहे त्यामुळे यावर्षी देखील विद्यार्थ्याकडून हजारो जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण होत तेव्हा शासनाने लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी मनोज जाधव यांनी जिल्हा अधिकारी मार्फत राज्याचे शालेय शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे प्रवेश प्रक्रिया साठी आठ दिवसाच्या आत सुरु न झाल्यास शिक्षणाच्या आईचा घो हे अनोखे आंदोलन देखील केले जाईल असे शिवसंग्राम चे मनोज जाधव यांनी सांगितले आहे.