महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले
बीड ( सखाराम पोहिकर ) आज दिनांक 13/1/2023 रोजी सकाळी 12 वाजता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री सखाराम पोहिकर . तालुका सचिव सय्यद जावेद तालुका कार्यकारणी निमत्रंक शेख याशीन तालुका सदस्य सुरेश दरेकर . राजेद्र ढाकणे या सर्व पदाधिकार्यानी आज गटविकास अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देताना या निवेदना मध्ये प्रमुख मागण्या याप्रमाणे 1 ) 26 जानेवारी निमित्त गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्याना गणवेश देण्यात यावा . 2 ) राहणीमान भत्ता देण्यात यावा . 3) ग्रामपंचायत कडील हिस्सा 8 : 33 % G P .F प्रक्रिया गतिमान करणे या सर्व मागण्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना यांचा लाभ मिळावा म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहोत ( अ ) ग्रामपंचायतीची सांपत्तीक तथा आर्थिक परिस्थिती उत्तम आणी सक्षम असली तरी त्या ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना गणवेश सुध्दा देत नाहीत . सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी . हे कर्मचाऱ्यांना अधिकाराने कामे सांगतात मात्र कर्मचाऱ्यांच्या किरकोळ स्वरूपाच्या मागण्या सुध्दा पुर्ण करत नाहीत गेवराई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना शासनमान्य असणारा राहणीमान भत्ता अदा करत नाहीत विशेष म्हणजे आपल्या कार्यालयाने वारवार सुचना देऊन . सुध्दा यांची अमलबजावणी होत नाही . सांगतात की ग्रामपंचायत ची वसुली नाही . ग्रामपंचायत ची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही आशी उतरे दिली जातात मात्र ग्रामपंचायत निवडणूकाच्या दरम्यान वसुली फार मोठ्या प्रमाणात झालेली . आसल्यामुळे कर्मचाऱ्याना राहणीमान भत्ता देणे आवश्यक आहे तेव्हा या संदर्भात मा गटविकास आधिकारी यांनी गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना योग्य त्या सुचना देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व या निवेदनातील मागण्या मुद्या क्र . अ . ब . चा सहानुभूती पुर्वक विचार करून आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना .. न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे