राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय माजलगाव व सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. "कोणत्याही व्यक्तीच्या समस्याचे मूळ मुख्यतः त्याचे विचार आहेत" हे या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीचे ब्रीदवाक्य होते. या प्रभात फेरीची सुरुवात डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माजलगाव यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के. सानप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी,उपप्राचार्य डॉ.एन.के. मुळे, प्रा. पवन शिंदे, प्रा. प्रकाश गवते, पर्यवेक्षक एम.के. अलजेंडे, प्रा. सुदर्शन स्वामी, प्रा. वैजवाडे, नवनाथ चव्हाण जिल्हा रुग्णालय बीड, समुपदेशक शहाबुद्दीन शेख, सय्यद रईस, दिलीप पाटील ग्रामीण रुग्णालय माजलगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभात फेरी महाविद्यालय-आंबेडकर चौकातून निघून परत महाविद्यालय अशी काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन करून राष्ट्रीय युवा दिनाची शपथ दिली. राष्ट्रगीताने प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नितीन ढवळे, प्रा. उमेश राठोड, डॉ. बिलास काळे डापकु कर्मचारी, आय सी टी सी माजलगाव, लिंक वर्कर प्रकल्प यांनी परिश्रम घेतले माजलगाव येथून एडस जनजागृती साठी आंबेडकर चौक ते सुंदरराव सोळंके विद्यापीठ पर्यंत जनजागृती एडस साठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये युवक व युती यांनी मोठ्या संख्या मध्ये उपस्थित राहून एडस जनजागृती चे जनतेपर्यंत पोहोचले,माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सय्यद रईस अनिस हे या रॅलीमध्ये सहभाग होता.