न.प. ने माजलगाव शहरातील मोकाट जनावरे व रोग बाधित कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा - नुमान चाऊस
सविस्तर वृत्त असे की, माजलगाव शहरात रोग बाधित कुत्र्यांची संख्या अचानकपणे वाढली आहे. त्यांना खाज सह अन्य वाईट रोगांची लक्षणे त्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. माजलगाव शहरात जागोजागी हे रोग बाधित कुत्रे आढळून येतील. त्यांच्यापासून नागरिकांच्या स्वास्थ्याला गंभीर धोका आहे. लहान मुलं बाळांना तर जास्त धोका आहे. असले रोग बाधित कुत्रे कोणाला चावणे, घाण करणे, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना तोंड लावणे याद्वारे अनेक रोग हे नागरिकांत व विशेषतः मुलं बाळांत पसरवू शकतात. ही बाब माजलगाव शहर वासियांसाठी अत्यंत धोकादायक व गंभीर आहे. झेंडा चौक, मस्जिद चौक, हनुमान मंदिर, आंबेडकर चौक, मुस्तफा मस्जिद, धारूर रोड, मोंढा रोड, सिद्धेश्वर शाळा, कन्या शाळा, बुखारी शाळा, महात्मा फुले शाळा, शहर पोलीस स्टेशन, शिवाजी चौक, संभाजी चौक, बीड रोड तसेच अनेक जागांवर मोकाट जनावरे व कुत्रे हे रस्ता अडवून बसलेले असतात. रस्त्यांतून जाणाऱ्या नागरिकांना धडक मारणे असे प्रकार होत आहेत. जवानांसह वृद्धांना व लहान मुलं बाळांना पण जीवास व स्वास्थ्यास खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे. तरी आजपर्यंत नगरपालिकेने व प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा देखील घेतलेला आहे तरी मौलाना आझाद युवा मंच तर्फे नगरपालिका व प्रशासनाला मागणी करण्यात येते की लवकरात लवकर या रोग बाधित कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, रस्त्यातून नागरिकांना व विशेषत मुलं बाळांना सुरळीत येणे जाणे मध्ये कसलीही बाधा येऊ नये याची दखल घ्यावी. अशी मागणी मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.