स्विफ्ट आणि दुचाकी अपघातात एक महिला जागीच ठार एक गंभीर जखमी
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील गढी या ठिकानी चार चाकी व दुचाकी ची समोरासमोर धडक होऊन एक महिला ठार तर एक जण गंभीर जखमी सह 3 जण जखमी झाल्याची घटना माजलगाव रोडवर शुक्रवारी 5 वाजण्याच्या सुमारास घडली . यामध्ये सुशीला अश्रुबा उबाळे या जागीच ठार झाली तर त्यांचा नातू संतोष उबाळे यांचा उपचार दरम्यान मुत्यू झाला तर उर्वरीत जखमीवर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत संतोष उबाळेला पुढील उपचारासाठी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात नेत आसता त्याचा उपचार दरम्यान मुत्यू झाला आहे
याबाबत अधिक माहिती आशी की संतोष उबाळे हे त्यांच्या दुचाकीवरून आजीला गेवराई येथे डोळ्याची तपासणी करण्यासाठी आले होते . डोळ्याची तपासणी करून भेंडटाकळी येथे दिनांक 27 जानेवारी शुक्रवार या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भेंड टाकळी येथे जात आसताना माजलगाव येथून लग्न समारंभ उरकून स्विफ्ट गाडी मधून विहामांडवा येथे माजलगाव रोडवर गेवराई कडून भेडटाकळी कड़े दुचाकी वर जात असताना संतोष धर्मराज उबाळे वय वर्षे 30 रा भेंडटाकळी व आजी सुशीला उबाळे वय 65 वर्षे राहणार भेंडटाकळी यांना स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली यामध्ये सुशीला अश्रुबा उबाळे या जागीच ठार झाल्या तर संतोष उबाळे हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आसता त्यांचा उपचार दरम्यान मुत्यू झाला असून स्विफ्ट गाडी मधील तीन जण जखमी झाले असून त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढील तपास गेवराई पोलिस स्टेशनचे पी आय व पोलिस कर्मचारी करत आहेत.