आमचे गाव हागणदारीमुक्त करण्याचे आदेश द्यावे यासाठी डॉ शेषेराव मुंढे यांची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील मिरकाळा गावच्या मुख्य रस्त्यावर घानीचे साम्राज्य झाले आहे.हि घान गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे हि बाब डॉ शेषेराव मुंढे यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन मिरकाळा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी आदेश ग्रामपंचायतला द्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.डॉ शेषेराव मुंढे हे मिरकाळा गावचे नागरिक असून गावाकडे त्यांचे विशेष लक्ष असते.या निवेदनात असे म्हटले आहे की,"आमचे गाव चौहोबाजूने हागणदारीयुक्त व घाणीचे साम्राज्य , दुर्गंधीयुक्त असे झाले आहे . केंद्र सकाराच्या मते प्रथम शौचालय व नंतर देवालय हा सकंल्पनेस गावातील लोकांनी तिलांजली दिली आहे . शासनाचे स्वच्छता सानुग्रह अनुदान लाटुन घेतले असुन स्वच्छतागृहाचा वापर करीत नाहीत . गावाला पाणी भरपूर आहे त्याविषयी काही तक्रार नसुन मा . ग्रामसेवक व सरपंच हे दुर्लक्ष करीत आहे . खासदार फडांतुन सिंमेट व डांबरी रस्ता झालेला असुन काही लोक रस्त्यावर शौचालयास बसतात . महादेव मंदिर ते हनुमान रोकड सिद्ध मंदिरापर्यंत लोकांना जाता येता येत नाही . गावात नौकरदार आहेत . देवदर्शनाला सुद्धा लोकांना विष्ठेवरुनच जावे लागते हया सदरील घाणीमुळे गावाच्या सर्व बाजुने दुर्गंधी पसरली असुन त्यापासुन कॉलेरा , गॅस्ट्रो , टायफाईड ह्या आजाराच्या साथी फैलवतात तरी ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे याकडे संपुर्णपणे दुर्लक्ष आहे." असे या निवेदनात म्हटले आहे.डॉ मुंडेंच्या या महत्वपूर्ण भूमिकेतून मिरकाळा गाव हागणदारीमुक्त होईल का? या कडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ ग्रामपंचायत ला आदेश देऊन मिरकाळा गाव हागणदारीमुक्त करावे अशी अपेक्षा डॉ मुंडें बरोबरच गावकऱ्यांना सुध्दा आहे.