दिड लाखाचा गुटखा पकडला आयपीएस डॉ. बी.धीरज कुमार यांच्या पथकाची कारवाई...
माजलगाव वडवणी येथील रामबाग कॉलनी येथून दीड लाखाचे किमतीचे गुटखा पकडल्याची कारवाई आयपीएस डॉ. बी.धीरज कुमार यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2. वाजता केली या कारवाईमुळे आता गुटखा माफिया च्या दनावले आहेत. याबाबतीत अधिक माहिती अशी की वडवणी येथील ईश्वरचंद्र मोहन टकले वय 43 वर्ष रामबाग कॉलनी राम मंदिर जवळ यांच्या कडून गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आयपीएस. डॉ.बी. धीरज कुमार यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून छापा मारण्यात आला यावेळी त्यांनी आर एम डी पान मसाला राजनिवास सुगंधीत पान मसाला एमडी सेंन्टड तंबाखू गोल्ड हिरा पान मसाला आढळून आला ज्याची अंदाजे किंमत एक लाख 57 हजार 320 रुपये आहे पोलीस हवालदार रवी शंकरराव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वर चंद्रमोहन टकले यांच्याविरुद्ध गुरुवारी वडवणी पोलीस ठाण्यात मानवी आरोग्याला अपायकारक असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ गुटखा सह मिळवून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांगणे हे करीत आहे.