भाजपा नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघातात मृत्यू....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
माजलगाव येथील भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप हे औरंगाबादहून माजलगाव ला काम आटपून परत येत असताना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराई जवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्यांच्या मित्र आर्यन कटुले हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते काम आटोपून गावी माजलगाव कडे येत असताना गौरी जवळ शुक्रवारी रात्री 12 च्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील केटा MH-44-T-5152 विश्वजीत यांचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पोला धडक बसली यात विश्वजीत यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासह असलेल्या मित्र आर्यन कंटुले हा सीट बेल्ट लावलेल्या असल्याने सुदैवाने वाचला ही घटना शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे.