राष्ट्रध्वज व भारतमातेचा अपमान करून सामान्य नागरीकांच्या व तक्रारकर्ता यांच्या भावना दुखवल्याबद्दल तक्रारकर्ता पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र आज भेटले
कर्मचारी व क्षेत्रीय अधिकारी पूर्व झोन यांच्यावर राष्ट्रध्वज व भारतमातेचा अपमान करून सामान्य नागरीकांच्या व तक्रारकर्ता यांच्या भावना दुखवल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय देण्यात करिता आज येथे न्याय मिळत नसून आज पर्यंत त्यांच्या वर गुन्हा नोद करण्यात न आल्यामुळे तक्रार करता अमरावती येथे माननीय उप महानिरीक्षक साहेब यांच्या कड़े रवाना तक्रारकर्ता आज का अकोला साप्ताहिक व भारत एम. एस. न्युज या वृत्तपत्राचा मुख्य संपादक आहे. अकोला महानगर पालिका अकोलाचे क्षेत्रीय पुर्व झोन येथे दिनाक १२/०१/२०२३ रोजी काही कामानिमित्य त्यांच्या मित्रांसोबत गेले असता तिथे एक भारत मातेची खंडीत मुर्ति आवारामध्ये फेकलेली दिसली व भारत मातेच्या मुर्तिच्या जवळ कार्यालयातील पुर्ण कचरा टाकलेला दिसुन आला व मूर्तिवर आजुबाजूला संपुर्ण घाणीच्या सांडपाण्यामध्ये व दारूच्या बॉटला सुध्दा पडुन त्यावर दिसल्यात. तसेच सदर मुर्तिसोबत राष्ट्रध्वज हा सुध्दा तेथे पडुन आढळुन आला. सदर बाबतीत ही तक्रारकर्ता तिथे हजर कर्मचारी व क्षेत्रीय अधिकारी पूर्व झोन यांना विचारपुस केली असता त्यांनी तक्रारकर्ताला उडवाउडवीचे उत्तरे देवुन तसेच क्षेत्रीय अधिकारी पुर्व झोन श्री. विजय परतवार यांना विचारपुस केली असता त्यांनी म्हणाले की, तुम्ही तुमचे काम करा ज्या काम तुम्ही पुर्ण करा व गपचुप निघुन जा. तुम्ही सदर प्रकरणामध्ये जास्त ढवळाढवळ जर केली तर तक्रारकर्ता यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तक्रारकर्ता त्यांनी सांगितले की मी पत्रकार आहे. आपण माझ्यासोबत अरेरावीची भाषा का बर बोलता आहा तर त्यांनी म्हटले की, तुझ्याच्याने जे होते ते करून घे आम्ही महानगर पालिका वाले आहोत व जास्त बोलशील तर राणीसती धाम एका महिलेचे घर ज्या पध्दतीने पाडले तर तुझे सुध्दा घर पाडुन देवु व आम्ही कोणाचेही घर पाडु शकतो व तुला जिवाने मारून सुध्दा टाकु. अशाप्रकारे मला धमकी देवून कार्यालयातुन काढुन टाकले. सदर मुर्तिचा फोटो व कार्यालयातील व्हीडीओ सुध्दा तक्रारकर्ता जवळ आहे..तरी महानगर पलिका अकोला येथील क्षेत्रीय अधिकारी पुर्व झोन यांच्यावर त्वरीत योग्य ती तत्काळ कार्यवाही करून यांना निलंबीत करण्यात यावे व तक्रारकर्ताला स्वरक्षण देण्यात यावे कारित सर्व वरिष्ठ अधिकारी व अकोला मधील प्रशासन याना तक्रार देण्यात आली परन्तु सदर प्रकरण मधे आज पर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नही म्हणून तक्रारकर्ता हे आज अमरावती येथे माननीय उप महानिरीक्षक साहेब यांच्या कड़े रवाना झाले होते तेथे 4 वाजता आय जी साहेब यानी यावर आम्ही एक्शन घेऊ व सर्व पुरावे समोर पाठवले आहे बघू आता तरी न्याय हे किती दिवसात मिळते याचे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.