अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी आसिफ खान व शहर अध्यक्ष पदी सैय्यद जमीर जेके व यांची निवड
अकोला :-अल्पसंख्यांक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष शोएब आसिफ खाटीक यांच्या आदेशानुसार अकोला शहर अध्यक्ष पद इंदिरा नगर निवासी सामाजिक कार्यकर्ता सैय्यद जमीर जेके व आसिफ खान यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगर सेवक नकीर खान,आकाश इंगडे पहेलवान,कॉग्रेस नेता मोईन खान (बन्टू),नौशाद खान,अकोला जिलाध्यक्ष मेहताब शाह आदि मान्यवर यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.अल्पसंख्यक विकास मंडलचे अकोला जिलाध्यक्ष मेहताब शाह तथा समीर खान यांचे आभार मानले व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.