जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.बी.डी. बिक्कड यांचा रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने सत्कार
बीड ( प्रतिनिधी) जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय बीड. येथे डॉ.बी.डी.बिक्कड यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यामुळे त्यांचा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या आदेशानुसार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड, बीड जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे, उपाध्यक्ष आशा कांबळे, कविता जोगदंड, गंगुबाई तायडे, सुनीता जोगदंड, पप्पू गायकवाड यांच्यासह इतर कंत्राटी कामगार प्रतिनिधी यांनी पूष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड, बीड जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे यांनी दिनांक: ११/०१/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्यादालनात बैठक होणार आहे. त्या वेळी नगर विकास शाखा यांचे प्रमुख म्हणून आपण कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित अद्यावत कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी सविस्तर टिप्पणी करून मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या टेबलावर ठेवावी अशी विनंती केली. तेव्हा जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. बी.डी.बिक्कड यांनी पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.