बीडच्या बिंदुसरा धरणात तरुणाचा मृतदेह आढळला.....
बीड धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली जवळील बिंदुसरा धरणात आज गुरुवारी दिनांक 5. जानेवारी दुपारी एक तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्यांनेआत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे वर्त आहे परंतु आत्महत्याचे कारण अद्याप समोर आले नाही समजलेली अधिक माहिती अशी की संतोष बाळू भुजंगे वय 38 वर्ष राहणार नेकनुर तालुका बीड असे मयताचे नाव आहे आज दुपारी संतोष भुजंगे यांचा मृतदेह बिंदुसरा धरणात पाण्यावर तरंगताना दिसून आला याची बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस आनंद मस्के पी टी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला संतोष बाळू भुजंगे यांनी रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे परंतु पोलिसाच्या तपासात कारण निष्पन्न पण होईल.