प्रहारच्या मागणीला यश दिव्यांग बांधवांना पंधराव्या वित्त आयोगातून 1 लाख 12 हजार 500 रू साहित्य आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या हस्ते वाटप
आज माजलगाव तालुक्यातील टाकरवन या ग्रामपंचायतीच्या दिव्यांग बांधवांना पंधराव्या वित्त आयोगातून (1)मा.यफसा नादान चव्हाण सायकल रिक्षा (2)मा.हरिभाऊ राधाकिसन लिंगे सायकल रिक्षा, (3)कुविद्या लक्ष्मण गरड व्हीलचेअर सायकल, (4) मा.विलास वामन लव्हाळे (कुबडी) व इतर दिव्यांग बांधवांना आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या शुभ हस्ते विविध साहित्य व पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आले हा कार्यक्रम टाकरवन ग्रामपंचायतचे सरपंच सौ शुभांगी सुनीलराव तौर व उपसरपंच मा. दत्तात्रय बाबुराव वराट व सदस्य यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सभापती मा. भागवतराव खुळे, उपसभापती मनसबदार पठाण, जयदत्त नरवडे, प्रहार तालुका अध्यक्ष गोपाळ पैंजणे, भारत डोंगरे, अशोका अर्जुन, प्रहार टाकरवन सर्कल प्रमुख लक्ष्मण गरड, विलास लव्हाळे यांच्या मागणीला यश आले असून त्यांनी सरपंच व उपसरपंच यांचे जाहीर आभार मानले