एस जे फाउंडेशन या बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने ज्ञान जोती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कंडारी अंबड येथे एस जे फाउंडेशन या बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने ज्ञान जोती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कॅॅंडल मिरवणूक काढून, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्या निमित्ताने मुलींना वही व पेन वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विशाल निसर्गन व संस्थेचे सल्लगार ओम खरात यांच्यासह मधुकर खरात, बन्सी पारवे,आनंद पारवे, संजय खरात, विक्रम खरात, धोंडीराम शिंदे, तात्याराव कारके.इ, उपस्तित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी पारवे यांनी केले. मनोगत तात्याराव कारके, मधुकर खरात, यांनी तर, आभार ओम खरात यांनी मानले. जोतिबा फुले सावित्रीबाई हे पात्र मनोज पारवे, कार्तिकी गायकवाड यांनी केले.