माजलगाव येथील पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब कुटुंब अन्नधान्य पासून वंचित..
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
माजलगाव तहसील पुरवठा विभागात सध्या गोरगरीब लोकांच्या नवीन डाटा एन्ट्री सहा सहा महिने होत नसल्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे व नवीन डाटा एन्ट्री पण N.PH या योजनेत होत आहे यापूर्वी माजलगाव शहरात पन्नास टक्के काळधारकांना APL शेतकरी या योजनेत माजलगाव तहसील येथील पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी गरीब लोकांचे कार्ड हे शेतकरी योजनांमध्ये टाकलेली आहे या कार्डधारकांना अर्धा गुंठा पण शेती नाही परंतु तहसील ने त्यांना शेतकरी घोषित केले व त्या सर्व कार्डधारकांना अन्नधान्य पासून वंचित ठेवले आहे यास पूर्ण तहसीलदार व पुरवठा विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत या त शंका नाही सध्या पुरवठा विभागात जादा पैसे दिल्यास डाटा एन्ट्री एक महिन्यात होते व लागली दुसऱ्या महिन्यात EPOS मशीनला PHH मध्ये नाव दिसतो व त्यांना राशन देखील मिळते व पैसे न दिल्यास त्यांची डाटा एन्ट्री.NPH या योजनेत करण्यात येते व ते पण सहा महिने लागतात सध्या पुरवठा विभागात डाटा एन्ट्री साठी दोनच ऑपरेटर आहे त्यांना विचारले असताना की डाटा एन्ट्री लवकर का होत नाही तर ते कारण सांगतात आमच्या मागे तहसीलचे दुसरे पण भरपूर कामे आहेत सध्या.OTP नाही.TSO. बंद आहे लॉगिन बंद आहे अशी दाखवून उडवा उडवी चे उत्तर देतात तरी मी तहसीलदार साहेबांना चार नवीन अपडेट ची नियुक्ती करावी जेणेकरून नवीन डाटा एन्ट्री एक महिन्याच्या आत होईल व दुसऱ्या महिन्यात.EPO. मशीनला दिसेल जेणेकरून काल लाभार्थी व कार्डधारकांची गैरसोय दूर होईल दवाखान्यासाठी लागणारी ऑनलाइन १२ अंकी नंबर लवकर मिळेल तहसीलदार साहेबांनी यापूर्वी पुरवठा विभागाने केलेल्या चुका.APL शेतकरी व.NPH. च्या डाटा एन्ट्री रद्द करून ते सर्व कार्डधारक.PHH. या योजनेत नाव घालण्यात व नवीन डाटा एन्ट्री देखील.PHH.या योजने त घाल ण्यात यावे व लवकरात लवकर चार महिन्यात नवीन डाटा एन्ट्री करण्यासाठी आपरेटरची नियुक्ती करावी व पुरवठा विभागाची मनमानी कारभार थांबून सुरळीत करा गोरगरीबावर व होणाऱ्या अन्याय थांबवा सध्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे व गोरगरीब झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध निघणाऱ्या मोर्चे व रस्ता रोको उपोषण आंदोलन तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन असे प्रकार थांबवा अन्यथा गोरगरिबाची सहनशीलता संपेल याची माजलगाव तहसीलदार व माजलगाव पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी.