राज ठाकरे यांची मंगळवारी परळी न्यायालयात उपस्थिती.....
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाल्यानंतर निषेध नोंदवत परळीतील पदाधिकाऱ्यांनी परळी गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक केली होती या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यासह राज ठाकरे यांच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणा संबंधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी परळी न्यायालय येथे उपस्थित राहणार आहे त्यानंतर परळी येथील बस स्थानका जवळील हॉटेल साई पॅलेस येथे ठीक दुपारी एक वाजता पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत तरी सर्व बीड जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव केशव बिडवे यांनी केले आहे.