वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नामविस्तार दिन उत्साहात साजरा
14 जानेवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार दिवस पण या नामविस्तार दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला सोळा वर्ष सतत रक्त, अश्रू सांडून अविरत संघर्ष करावा लागला. 14 जानेवारी 1994 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा जवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमा होतो. श्रद्धेने गेट पुढे नतमस्तक होतात, नामांतर लढ्यात शहीद झालेला हुतात्म्यांना आदरांजली वाहतो व नवीन लढ्यांना सज्ज होतो.
हा इतिहास साक्ष ठेवून भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो.
परळीतही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा(रेल्वे स्टेशन) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन मोठा उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नामांतरासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा सहसचिव ॲड.संजय रोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, शहराध्यक्ष गफारशहा खान, युवा तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, संजय गवळी, धम्मपाल क्षीरसागर, विष्णू मुंडे, ज्ञानेश्वर गीते,संदीप ताटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.