हिवरसिंगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालिका दिन साजरा
बीड तालुक्यातील हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि 3 जानेवारी रोजी ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी.एच.राख सर ( मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख ) तर प्रमुख अतिथी पालक प्रतिनिधी श्रीमंत शिदे श्री शिवराम राऊत श्री सिध्देश्वर दुधाळ नारायण गिरी श्री. आशोक शिंदे ( पत्रकार ) श्री रामेश्वर देवकर हे होते या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले प्रमुख अतिथी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी समिक्षा देवकर सिद्वांत दुधाळ शिवानी शिदे आकांक्षा दुधाळ ऋतुजा श्रीसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
शिक्षण हि विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असल्याने . बहुजन समाजातील पुरूषांना शिक्षण अधिकार नव्हता त्यावेळी पुरुष प्रधान संस्कृती . महिला तर केवळ चुल आणि मुल हिच परंपरा पण अशक्षित पणामुळे होणारे सामाजिक परिणाम हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी औळखुन ज्ञानज्योत गरिबांच्या झोपडीपर्यत न्यायचा आसेल तर घरातील बाई माणसाला शिक्षण दिले पाहिजे या विचाराने एक क्रांती झाली व आजची स्त्री विश्व जिकण्याचा आत्मविश्वास दिला असे मत श्री शिवराम राऊत . यांनी व्यक्त केले यावेळी कु . ईच्छा भालेराव इ ७ वीच्या विद्यार्थीनीने सुत्र संचलन केले या वेळी श्री कंठाळे सर श्री दत्ता दुधाळ सर श्री आरुण मिसाळ सर श्री कदम सर श्रीमती मिसाळताई . श्रीमती बोडखेताई . श्रीमती जेधेताई . सर्व शिक्षक वृंद तर . सौ . निर्जला राऊत सौ रामकवर दुधाळ व शिक्षणप्रेमी नागरिक . उपस्थित होते