फिर्यादी यांच्या तकारीची तात्काळ दखल घेवून सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध
महाराष्ट्र हेड रिपोर्टर सैय्यद ज़हीर
फिर्यादी उमेश कुमार रमेश कुमार वय ३० वर्षे, रा. वॉर्ड नं. ४, कलेक्ट्रेट कॉलनी, पी. डब्ल्यूडी ऑफिसच्या मागे, रायसेन, जि. रायसेन, मध्यप्रदेश है दिनांक ०२/०१/२०२३ रोजी १६.५० वाजताचे सुमारास ट्रेन नं १२४८५ गंगानगर नांदेड एक्सप्रेसने अकोला ते भोपाळ असा प्रवास करण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क.३ वर ट्रेनच्या जनरल कोचमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यांचे खिश्यातील एक रेडमी कंपनीचा १६,०००/- रू. मोबाईल किंमतीचा चोरून नेलेला असलेबाबत भोपाळ रेल्वे पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे. यातील फिर्यादी यांनी याबाबत रेल्वे हेल्प लाइन नंबर १३९ वर देखील तकार दिली असल्याने ती अकोला रेल्वे पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती. त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला गुरजि नंबर ०४/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दि.०३/०१/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या तकारीची तात्काळ दखल घेवून सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रिझवान शहा उर्फ डी.एम. इरफान शहा, वय २४ वर्षे, रा. पूरपिडीत कॉलनी, अकोट फैल, अकोला हा नमुद ट्रेनच्या वेळी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. त्यावरून त्याचा अकोट फैल परिसरात शोध घेवून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील एक रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच त्याव्यतिरिक्त इतर ४ मोबाईल असा एकूण १,३०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीस रिमांडकामी मा न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील असेच गुन्हे केलेले आहेत तसेच त्याला सन २०२२ मध्ये मा. न्यायालयाने २ गुन्हयामध्ये शिक्षा सुध्दा सुनावलेली आहे.
मा. पोलीस अधिक्षक सो, लोहमार्ग नागपूर, श्रीमती वैशाली शिंदे मॅडम, तसेच अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत तारगे सो यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, पोलीस उप निरीक्षक दिलीप जाधव, सहा. फौज. / ५८१ सतिश चव्हाण, सहा फौज / ५६ प्रविण मुंढे, पोलीस हवालदार / २८ संतोष वडगीरे, पो.हवा./ ७६ अन्सार खान, पो.शि./ ३५२ उल्हास जाधव, पो. शि. / १०८७ इरफान पठाण, पो.शि./ १३ विजय शेगावकर चालक पो.शि. ३२६ अमोल अवचार यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.