बीड ग्रामपंचायत निवडणुकीवरून सरपंचावर खुनी.हल्ला......
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
ग्रामपंचायत निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर गावातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात झालेल्या रक्तरंजित वादात सरपंच सह तीन जण जखमी झाल्याची घटना माळापुरी येथे घडली जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे बीड येथून जवळ च असलेल्या माळापुरी येथे रात्री सुमारास ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून वाद झाला यावेळी झालेल्या वादात नवनिर्वाचित सरपंच गट आणि पराभूत गट आमने सामने आले पराभूत गटातील सरपंच पदाच्या उमेदवार सलीमाबी दाऊद बेग, वय 55 वर्ष त्यांचा मुलगा नजीम बेग दाऊद बेग वय 31 वर्ष आणि हरून इस्माईल पठाण वय 38 वर्षे या तिघांवर कुकरी आणि दांड्याने हल्ला झाला या हल्ल्यामध्ये तिघेही जखमी झाले तीघावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर समोर च्या गटातील नवनिर्वाचित सरपंच अशोक ढास हे देखील जखमी झाले असून डोक्याला दुखापत झाली आहे घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेतली तणाव निवडला या प्रकरणात ग्रामस्थ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करून घेतल्याने संताप ग्रामस्थांनी पोलीस अध्यक्ष कार्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले..