भरधाव कार उसाच्या ट्रॉलीवर जाऊन धडकली तीन जण जागीच ठार झाले आहे......
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज....
अंबाजोगाई उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव वेगातील कार धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागी ठार झाल्याची घटना बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरवड पाटील जवळ रात्री साडेनऊच्या सुमारास घडली बर्दापूर जवळील मोरवड पाटी जवळ अंबाजोगाईहून लातूरकडे भर वेगात जात असलेली कार क्रमांक एम एच 44 यु ०६ ४७ ऊस वाहतूक करत असलेल्या ट्रॉलीला मागून धडकली अपघाता इतका भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरश चेदा मेदा झाला या अपघातात परळीतील तीन जण घटनास्थळीच मृत्यमुखी पडले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय उत्तरीय तपासणीसाठी तीनही मूर्तदेह घेऊन जाण्यात आले आहेत रात्री उशिरापर्यंत यातील नावे समजू शकले नाहीत