अशोक डक यांनी मुंबई बाजार समितीच्या सभापती पदाचा दिला राजीनामा....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबई बाजार समितीच्या सभापती पदावरून अशोक डक यांनी बुधवारी राजीनामा दिला राज्याच्या पणन संचालकांनी तो लगेच मंजूरही केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अडीच वर्षापासून अशोक डक सभापती होते ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाच्या कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी पणन संचालक पुणे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असल्याचे सांगितले जाते संचालकांनी तो राजीनामा मंजूर केल्याची मुंबई बाजार समितीला कळविले