रावेर तालुक्यातील अग्रिवीर चेतन वानखेडे याने नवस फेडण्यासाठी वायु वेगाने 47 कि.मी.धावून शिरसाळा येथील जागृत मारूतीचे घेतले दर्शन.
अमीर पटेल - जळगाव जिल्हा प्रतिनिधि
दि. २२ रावेर तालुक्यातील चिनावल येथील चेतन रमेश वानखेडे या तरुणाने भारतीय सेनेत आपला समावेश होण्यासाठी.शिरसाळा येथील जागृत मारूतीला नवस मानलेला होता त्यानुसार त्याची अग्निवीर साठी निवड झाल्याने नवस फेडण्यासाठी त्याने चक्क चिनावल ते शिरसाळा मारोती हे 47 कि.मी.चे अंतर सलग 6 तास धावत जाऊन मारोतीरायाचे दर्शन घेत आपला नवस पूर्ण केला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या चिनावलचा तरुण चेतन वानखेडे हा भारतीय सैन्य दलात भरती साठी दररोज सराव करीत होता एकदोन वेळा प्रयत्न केल्यावर त्याने शिरसाळा ता. बोदवड येथील मारूतीला साकडे घातले,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अग्निवीरसाठी पहिल्याच यादीत चेतनचा नबंर लागला आहे.नंबर लागताच चेतनने मानलेला नवस दि.21/12/2022 रोजी चिनावल येथून धावत जाऊन 6 तासात 47 किलोमीटर अंतर कापत मारूतीचे दर्शन घेत नवस फेडला.श्रद्धा हाच खरा विश्वास चेतनने सार्थ करीत दररोजच्या सराव व कठीण परिश्रमाने भारतीय सैन्य दलात स्थान मिळवल्याने त्याचे चिनावल व परिसरात कौतुक होत आहे . नवस फेडण्यासाठी मित्र परिवाराने त्याला प्रोत्साहन दिले.