यावल येथे काँग्रेस पक्षाच्चा स्थापना दिवस साजरा
अमीर पटेल - जळगाव जिल्हा प्रतिनिधि
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या आदेशाने स्थापना लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापनादिनानिमित्त आज शेतकी संघ येथे यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिप गटनेते तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर इंटकचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भगतसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी प्राचार्य जि.पी.पाटील सर यांनी काँग्रेसचा इतिहास ,बलिदान, देशासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात देशाला मिळालेलं स्वातंत्र्य यावर सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसचा इतिहास सांगितला त्याचप्रमाणे प.स गटनेते बापूसाहेब शेखर पाटील,राष्ट्रवादीचे बोडदे नाना, सहित मान्यवरांनी मार्गदर्शन करून काँग्रेस पक्षाच्या देशाला योगदानाबद्दल माहिती दिली सदर कार्यक्रमाला शेतकी संघ चेअरमन अमोलभाऊ भिरुड, युवानेते कोरपावली गावचे माजी सरपंच जलीलदादा पटेल,फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई,मारुळचे सरपंच सय्येद असद, जिल्हाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, शहराध्यक्ष नईमभाई शेख,नगरसेवक रसूल मेंबर, मनोहर सोनवणे,समीर मोमीन,वढोदा सरपंच संदीपभैय्या सोनवणे,हाजी गफ्फार शाह, समाजसेवक मुक्तार पटेल,गुरव सर, कोरपावलीचे माजी उपसरपंच इस्माईल तडवी,जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी,शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे,रहेमान खाटीक, पस माजी सदस्य प्रशांत पाटील,डॉ. योगेश पालवे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इखलास सय्यद,मारुळचे ग्राप सदस्य बशीर रहेमान, मसरुल अली,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मण्यार, समाजसेवक करीम कच्ची, रशीद मण्यार, अमर कोळी,अल्ताफ तडवी,सकलेन शेख, समाधान पाटील,शिरसाडचे उपसरपंच आबाभाऊ पाटील,सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, उबाठा शिवसेनाचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी महाविकास आघाडी मित्रपक्ष या नात्याने काँग्रेस स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात गुरव समाज जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गुरव सर यांचा तर ग्राप सदस्यपदी निवडून आल्याबद्दल चंद्रकलाताई इंगळे, गुजरात विधासभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभाग घेतल्या बद्दल जलीलदादा पटेल यांचा, आदिवासी नेते मुनाफ तडवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून दिली सक्रिय झाल्याबद्दल तसेच प.स माजी सदस्य प्रशांतभाऊ पाटील यांचा काँग्रेस पक्षात पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल भिरुड यांनी केले तर आभार जलील पटेल यांनी मानले