अशोक डकांना मतदाराने बसविले घरी.....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज....
माजलगाव तालुक्यातील सोन्नाथाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक यांनी उभे केलेल्या पॅनल मधील सरपंच पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे त्यामुळे त्यांच्या वाट्याला सरपंच पदाऐवजी आता उपसरपंच पद येणार आहे ओबीसी प्रवर्गाला राखीव असलेल्या सरपंच पदासाठी अशोक यांच्या उमेदवाराचा पराभव करून भाजप गटाकडून उभ्या असलेल्या वंदना केरबा तपासे यांनी बाजी मारली आहे ग्रामस्थांनी अशोक यांना राजकीय धक्का देत भाजपचा उमेदवार निवडून दिला आहे नुकताच माजलगाव मतदार संघातील धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना जबरदस्त धक्का बसलेला असतानाच आता तसेच विश्वासू अशोक यांना देखील ग्रामस्थांनी घरचा रस्ता दाखविलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे पार तुरतुस कमी होताना दिसून येत आहे असेच म्हणावे लागेल दरम्यान वंदना तपसे यांचे पती केरबा तसे सामान्य कुटुंबातून असून गावचे कोतवाल असल्याने मतदाराने त्यांना सरपंच पदाचा कौल दिला आहे