विवाहासाठी जाताना कार उलटून एक ठार
शेंद्रा : वरूड पाटीपासून चिकलठाण्याकडे विवाहासाठी जाणाऱ्या कारचालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार , तर दोन जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४.५० वाजेच्या सुमारास ऑस्टर शाळेजवळ घडली . हरिदास घायट ( ३० , रा हातमाळी , ता . औरंगाबाद ) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे . अन्य दोन जखमींना नागरिक व पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले .
औरंगाबाद- जालना महामार्गावर दुभाजकाला धडकून कार ( एमएच ४८ एस १७२४ ) उलटली . या अपघातात एक ठार आणि दोन गंभीर जखमी झाले आहेत जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत . हे तरुण वरूड पाटीपासून चिकलठाण्याच्या दिशेने विवाह समारंभासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले . याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली . पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रवींद्र साळवे , आदिनाथ शेकडे अधिक तपास करीत आहेत .