खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चा प्रश्न थेट संसदेत मांडला...
प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
शिष्यवृत्तीरद्द करण्याचा निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी... अल्पसंख्याक विद्यार्थी चे शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थीचे मोठे नुकसान झाले असून आर टी ई अंतर्गत बालकांना शिक्षण मोफत आहे मात्र अल्पसंख्यांक विद्यार्थी साठी हे शिष्यवृत्ती प्रोत्साहन पर काम करते त्यामुळे शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय याचा खेळ विचार करावा अशी मागणी बीड खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी आज दुपारी 1.15 वाजन्याच्या सुमारास संसदेत अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चा प्रश्न मांडला खासदार प्रीतम ताई मुंडे म्हणाले की भारत सरकारकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी प्रिमटिक शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे याच वर्षी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत यामुळे केंद्र सरकारने निर्णयाचा पूर्ण विचार करावा अशी मागणी खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी केली येणाऱ्या पिढीला बाल कामगाराच्या खाईत न लोटता त्यांना शिक्षणाच्या मार्गावर मार्ग स्थ करण्याच्या अनुषंगाने या निर्णयाचा फेर विचार करावा अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे