बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमिज सर यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा.......
प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
सामाजिक कार्यकर्ता रेहान जहागीरदार बदनाम करण्यासाठी स्थानिक नेत्याचे षडयंत्र.... स्थानिक नेते वरिष्ठ नेत्यांनी मिळून एमआयएमचे बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमिज सर यांना बदनाम करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे षडयंत्र असा आरोप रेहान जागीरदार यांनी केला आहे दिनांक 11 डिसेंबर रोजी अंबाजोगाई शहरातील पंचायत समिती समोर आठ ते दहा समाज कंठकांनी परळी हुन अंबाजोगाई मार्गे उस्मानाबाद जाणाऱ्या लग्नाची ट्रॅव्हल्स ला तोडफोड करून ड्रायव्हरला आणि एका समुदायातील महिलांना शिवीगाळ व मारहाण केल्यामुळे ड्रायव्हर यांनी ट्रॅव्हल्स ला शहर पोलीस स्टेशनला आणले या घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे बीड जिल्हा पर्वक्ता शेख रमिज सर यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन ड्रायव्हरला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर रात्री उशिरा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमिज सर यांच्या वर राजकीय नेत्यांना पुढे करून कलम 324, 323, 504 ,506 ,34 स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, सामाजिक पक्षातील कार्यकर्ते यांच्यावर आशा स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ती कार्यकर्ते यांची गळचेपी आहे याबाबत जनमाणसाना निष्पक्ष चौकशी करण्याची जनभावना आहे एम आय एम चे बीड जिल्हा पर्वक्ता शेख रमिज सर यांची बदनामी करण्यासाठी अशा पद्धतीचे षडयंत्र रचले जात असेल तर समाजात काम करण्याचा कार्यकर्ते यांचा राजकीय आयुष्य संपुष्टात येईल त्यामुळे शेख रमिज सर यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे आणि खोटी फिर्याद देणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रेहान जागीरदार यांच्यावतीने होत आहे