महाराष्ट्र हेड रिपोर्टर सैय्यद ज़हीर
अकोला रेल्वे पोलीस यांचे उल्लेखनीय कार्य
महाराष्ट्र हेड रिपोर्टर सैय्यद ज़हीर
रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला गु.रजि नंबर 418/2022 IPC 379 प्रमाणे दिनांक 02/12/2022 रोजी दाखल असून सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आनंद उर्फ गोल्या अनिल जाधव, वय 23 वर्षे, रा. अकोट फैल, अकोला याने केला असल्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती. त्याचा शोध घेत असताना तो गुन्हा करून राजस्थान येथे पळून गेला असल्याची माहिती मिळाली.
आज रोजी तो अकोट फैल येथे आला असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला आहे. त्याने गुन्हयात चोरी केलेले 2 मोबाईल किंमत 31,000/- रुपये असे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले असून त्यास गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आली असून मा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर, श्रीमती वैशाली शिंदे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला, श्री अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली API अर्चना गाढवे, ASI मुंढे, पोलीस नाईक विजय रेवेकर, PC उल्हास जाधव, कपिल गवई, इरफान पठाण, विजय शेगावकर यांनी केली आहे.