भरधाव कार ट्रकला धडकली.... तिघे जखमी एकाची प्रकृती चिंताजनक...
माजलगाव प्रतिनिधी
बीड येथे भरधाव कार पाठीमागून एका ट्रकला धडकल्याने झालेला अपघातात तिघे जण जखमी झाल्याची घटना काल रात्री मांजरसुंबा घाटात घडली दरम्यान तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत श्रीरामपूर कडुन नांदेड ला जाणारा स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाला पावसामुळे समोरच्या गाडीचा अंदाज न आल्याने कार भरधाव वेगात समोरच्या दहा टायरच्या ट्रक ला पाठीमागून धडकली या अपघातात कीफायत मुक्तार शेख वसीम नजीर मुलांनी महेक हजरत बागवान तिघे जखमी झाले यापैकी कीफायत यांना गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती कळतच अँड शफिक भाऊ यांचे सहकारी सोनू शेख हुसेन चाऊस सैफ कोल्हारवाडी येथील शिंदे बंधू यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना गाडीच्या बाहेर काढून त्यांना तात्काळ उपचारासाठी बीडला आणले जखमेवर काकू नाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ज्येष्ठ समाजसेवक मोमीन मास्टर टिपू सुलतान युवा मंच अध्यक्ष अँड इरफान बागवान गणी बागवान पंकज धांडे आदिनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीची विचारपूस केली....