ऊस तोडी करीत असताना विखुरलेल्या अवस्थेतील माणूस सांगाडा सापडण्याची घटना रामपिंपळगाव शिवरात बुधवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली दरम्यान चार महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्ति चा हा सांगडा असल्याचे निष्पन्न झाले आहे माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव शिवरात आंबा साहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे या दरम्यान आज सकाळी ऊस तोड मंजुरांना उसाच्या पाचटात मानवी कवटी आढळून आली घाबरलेल्या मंजुरांनी ही बाब शेतकरी मालकास सांगितली याची कल्पना पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी करत इतर अवयव शोधून काढले त्याचबरोबर कपडे आणि चप्पल ही सापडली दरम्यान पोलिसांना 25 ऑगस्ट 2022 रोजी राधाकिसन बाबुराव जगदाळे वय 63 वर्ष राहणार हरकीलिमगाव या बेपत्ता व्यक्ति शी साम्य आढळून आले पोलिसांनी जगदाळे यांच्या नातेवाईकांना बोलावून सांगाडा कपडे चप्पल दाखविले यावरून सांगाडा राधाकिशन बाबुराव जगदाळे यांच्या असल्याचे त्यांच्या मुलगा तुळशीराम राधाकिशन जगदाळे यांनी स्पष्ट केले पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी चांगला अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाते व पोलीस शिपाई विलास खराडे हे करीत आहे.
ऊस तोडी सुरू असताना सापडला मानवी सांगाडा.....
गुरुवार, दिसंबर 15, 2022
0
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..