सर्वसामान्य गोरगरिबांचे आरोग्यदाते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत उर्फ सुरेश साबळे यांना पुरोगामी पत्रकार संघाचा लोकरत्न पुरस्कार जाहीर
माजलगाव प्रतिनिधि तबरेज बाबर शेख
सर्वसामान्य गोरगरिबांचे आरोग्यदाते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत उर्फ सुरेश साबळे यांना पुरोगामी पत्रकार संघाचा लोकरत्न पुरस्कार जाहीर झाला असून ३ जानेवारी २०२३ रोजी वितरण होणार आहे.
पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा २०२३ चा लोकरत्न पुरस्कार डॉ. सुरेश साबळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात ३ जानेवारी २०२३ रोजी केले जाणार आहे. डॉ. साबळे यांनी सुरुवातीला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून तर आता पदसिद्ध पदी नियुक्ती झाल्यानंतरही सातत्याने आपल्या उत्कृष्ट सेवेने रुग्णांकरिता सर्वोत्तम ते आरोग्यदायी कार्य करीत आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक प्रशासकीय सेवा चांगल्या रीतीने व गतिमान कशी करावी याचा परिपाठ त्यांनी आजपर्यंतच्या कार्यकाळात सातत्याने दाखवून दिला आहे. त्यांच्या सेवेची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाने त्यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर केला असून पुरस्काराचे वितरण येत्या ३ जानेवारी २०२३ रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टर साबळे यांना लोकरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याने रुग्णांसह सर्वसामान्य जनतेकडूनही खऱ्या रत्नाला लोकरत्न पुरस्कार मिळत असल्याचे गौरवोद्गार काढले जात असून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.