माजलगावात कुत्रांची नवीन रोग, मुलांचे आरोग्य धोक्यात,नपने तात्काळ उपाययोजना करा- शेख रशिद
माजलगाव-माजलगांव शहरात रोडवर, गल्लोगल्लीत कुत्रे टोळीच्याटोळी जमा करुन नागरिकांना भोकने,चावा घेणे हे नविन नाही पण सध्या माजलगाव शहरात कुत्र्यांची नवीन रोग साथ अस्तित्वात येत असून त्यात कुत्र्यांची अंगावरील केस जावून रक्त वाहू लागणे तसेच अशक्त पणामुळे नागरिक, लहान मुलांच्या अंगावर येवून कुत्रं चावा घेत आहेत तसेच कुत्र्यांची अंगावरील केस जावून रक्त वाहू लागल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन इन्फेक्शन ची वाढ होऊन नविन रोगाची साथ येण्याची शक्यता आहे
त्यामुळे अश्या कुत्र्यांवर लक्षणे दिसल्यास तात्काळ उपाययोजना राबविणे गरजेचे आहे तसेच पालकांनी आपआपल्या लहान मुलांचं अश्या रोग कुत्र्यांन पासुन दुर ठेवावे तसेच नगरपरिषदने अंगावरील केस जावून रक्त वाहू लागतं अश्या रोगी कुत्र्यांना धरुन व्हेटर्नरी डॉक्टर कडुन इलाज करावे व सध्या शाळा, कॉलेज, कोचींग क्लासेस किंवा रहदारी असलेल्या ठिकाणांवर विशेष टिम तय्यार करुन रोगी कुत्रे लवकर धरुन उपचार करावे अश्या मागण्या एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.