मतदानासाठी गावी परत आलेल्या मोटरसायकल स्वार तरुणाचा अपघातात मृत्यू....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज....
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदानासाठी बाहेर जिल्ह्यात असलेले मंडळी गावाकडे परततात आहे त्यातच मतदानासाठी औरंगाबाद येथून सारनेकडे दुचाकीवरून जात असलेल्या युवकाचा भरधाव कारणे धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना नेकनूर मांजरसुंबा रस्त्यावर गवारी जवळ घडली मृत्यू व्यक्तीचे नाव श्रीकृष्ण अनिल गायकवाड वय 35 वर्ष राहणार आनंदगाव सारणी असे मृत्यू तरुणाचे नाव आहे औरंगाबाद येथे असलेल्या श्रीकृष्ण गायकवाड हा उद्या होणाऱ्या मतदानासाठी गावाकडे मोटरसायकल क्रमांक एम एच 20 सिएक्स 1102ने जात होता केज मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या गवारी जवळ आला असताना समोरून आलेली भरधाव किंवा इनोव्हा कार क्रमांक. एम एच 20 एल 7009 ने मोटर सायकल ला जोराची धडक दिली घटना घडतात जखमी मोटरसायकल स्वार श्रीकृष्ण गायकवाड यास नागरिकांनी तातडीने नेकनूर रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या इसमास मृत्यू घोषित केले.