काँग्रेस तर्फे माझा गाव माझी शाखा अभियान सुरु
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
दि.१६/१२/२२ शुक्रवार रोजी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या माझा गाव माझी शाखा अभियान अंतर्गत रावेर तालुक्यातील निंभोर येथे नूतन कार्यकरणी जाहीर करण्यात आली.
सदरील शाखा चा उद्घाटन करण्यात आले. युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष श्री कुणाल दादा राऊत जी यांची मान्यतेने रावेर यावल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.शिरीष चौधरी व माजी खासदार श्री.डॉ.उल्हास पाटील ,युवक जिल्हा अध्यक्ष श्री.देवेंद्र मराठे,माजी प. समिती सदस्य श्री.प्रभाकर सोनवणे जी,रावेर तालुका अध्यक्ष श्री. डॉ.राजेंद्र पाटील जी व रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे युवा नेतृत्व श्री धनंजय भाऊ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस चे रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. फैजान शाह यांचे हस्ते सदर शाखाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन केल्या नंतर शाह यांनी कार्यकर्ता सोबत मनोगत व्यक्त केले असून जास्त जास्त पक्षाची टाकत दुप्पट करायचा आवाहन दिले
या वेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता श्री. शोएब खान
नवनियुक्त शहर अध्यक्ष अझहर खान,उपाध्यक्ष शेख कलीम,उपाध्यक्ष सोहील सय्यद,महासचिव नयुम बैग,महासचिव रमझान पटेल,महासचिव अमीन सय्यद,सचिव शेख जविद,सचिव शेख मुसा आदी उपस्थित होते.