माजलगाव प्रतिनिधी
कॉलेजच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास जमावाने केले पोलिसाच्या स्वाधीन...
तीन महिन्यापासून पाठलाग करून दिला जात होता त्रास...
कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या इसमास मुलीच्या नातेवाईकासह जमावाने पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले ही घटना शनिवारी दिनांक 10-12-2022 रोजी सकाळी अकरा वाजून 30 मिनिटांनी दरम्यान माजलगाव शहरातील आंबेडकर चौक येथे घडली गेल्या तीन महिन्यापासून सदरील इसमास मुलीचा पाठलाग करून आरोपी इसमा कडून त्रास दिला जात होता मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचे शिकवणीचे क्लास पासून ते महाविद्यालयाला जात असताना छेडछाड करून त्रास दिला जात होता याबाबत मुलीने काही दिवस सदरील दिल्या जाणारा त्रासाला दुर्लक्ष केले परंतु आरोपी इसमांकडून सारखे इशारे करून त्रास वाढतच असल्याने हि बॉब त्यांनी त्याच्या नातेवाईकास सांगितले त्यानंतर मुलीच्या नातेवाईकाकडून कोणाकडून त्रास दिला जात आहे याच्यावर लक्ष ठेवण्यात आले दरम्यान शनिवारी दिनांक 10-12-2022 रोजी सदरील मुलगी शिक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी माजलगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शैक्षणिक साहित्याच्या दुकानाकडे जात होती यावेळी सदरील आरोपी इसम आपल्या मोटरसायकलीवर आला व वरून तिला आडवा आला व त्याच्याकडे इसमाने मोबाईल नंबरची मागणी करू लागला यावेळी फिर्यादीने गर्दा केला सदरील आजूबाजूला असणाऱ्या जमावाने छेडछाड करणाऱ्या इसमास रंगेहात पकडले व त्याला जाग्यावर चोख दिला व पोलिसाच्या स्वाधीन केली दरम्यान पिडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी जफर रहिमुदीन इनामदार वय 29 वर्ष राहणार इंदिरानगर माजलगाव याच्याविरुद्ध पोस्को 18 सिटी सह कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अटक असून पुढील प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक बी.धीरज कुमार हे करीत आहे