हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातुन 30 ते 40 हजार कर्मचारी या मोर्चा मध्ये सहभागी
नागपूर ( सखाराम पोहिकर )
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने नागपूर या ठिकाणी आज सकाळी चाचा नेहरू ऊदयान येथून सकाळी 11 वाजता या मोर्चास सुरूवात करण्यात आली यावेळी या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव क्रॉ नामदेव चव्हाण राज्य अध्यक्ष क्रॉ तान्हाजी ठोबरे व क्रॉ मिलिद गनविर क्रॉ सखाराम दुरूगुडे या मान्यवराच्या मार्गदर्शनाखाली मोर्चास सुरूवात करण्यात आली आहे, यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी जवळ पास 30 ते 40 हाजार कर्मचारी या मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला आहे या मोर्चा मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या खाली प्रमाणे
48 महिण्याचे फरक देण्यात यावा थकीत राहणीमान भत्ता देण्यात यावा, कलम 61 रद करण्यात यावा, आकृती बंध तात्काळ रद्द करण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचार्याला 25 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचारी प्रमाणे आम्हाला पगार द्या किवा आमच्या प्रमाणे त्या कर्मचान्याना पगार द्या आशा विविध मागण्या घेऊन हा मोर्चा विधान भवनावर धडकला आहे तेव्हा जो पर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत आमचा लढा चालू राहील आसे परखड मत क्रॉ नामदेव चव्हाण यांनी मोच्यास मार्गदर्शन केले