माजलगावाचे नांव देशपातळीवर उज्ज्वल करणारे हाफेज माजेद ची लोकप्रतिनिधींना एलर्जी आहे का?-शेख रशिद
माजलगाव: आपल्या माजलगाव शहरातील रहिवाशी सर्वसामान्य कुटुंबातील हाफेज माजेद बागवान ह्यांनी पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावत यश संपादन करून माजलगाव चे नांव देशपातळीवर उज्ज्वल करणारे बिल्डर हाफेज माजेद यांना लोकप्रतिनिधींना साधी भेट द्यायला तय्यार नाही. हाफेज माजेद यांची लोकप्रतिनिधींना एलर्जी आहे का?असा सवाल एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी विचारला आहे.
देशपातळीवरील लुधियाना पंजाब येथे IBBF MR India सिनियर नेशनल्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे दि.२३, २४ व २५ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६५ किलो वजन गटातून हाफेज माजेद बागवान याने राज्याचे नेतृत्व करताना आपल्या पिळदार शरीरशृष्टीचे प्रदर्शन करत पाचवा क्रमांक पटकावला. प्रथमच देश पातळीवरील स्पर्धेत आपल्या शहरातील तरुणाने आपली चमक दाखवून दिली आहे.हाफेज माजेद यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत देशपातळीवर माजलगाव चे नांव उज्ज्वल केले आहे. लुधियाना पंजाब येथून यश संपादन करून माजलगाव शहरात येताच बॉडी बिल्डिंग प्रेमीसह नागरिकांनी त्याचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले पण कोणीही लोकप्रतिनिधींनी हाफेज माजेद यांची साधी भेट घेतली नाही.आमदार,खासदार तुमच्याकडे वेळ नाही का? हाफेज माजेद यांची तुम्हाला एलर्जी आहे का? असा सवाल एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारला आहे.