रांजणी / शिदेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कु. भाग्यश्री आसाराम रोडगे तर उपसरपंचपदी विष्णू बाबासाहेब करांडे यांची बिनविरोध निवड
गेवराई ( सखाराम पोहिकर )
दि . 30 डिसेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत रांजणी / शिदेवाडी येथें उपसरपंच पदाची निवड करण्यात आली असून रांजणी / शिदेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी विष्णू बाबासाहेब करांडे यांची बिनविरोध निवड झाली निवडणूकीचे प्रोसोडींगचे काम गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास आधिकारी श्री घोलप साहेब व बांधकाम विभाग गेवराईचे शेख साहेब व रांंजणी सजा चे तलाठी राजाभाऊ सानप साहेब यांनी हि निवडणूक खेळी मेळीच्या वातावरणात पार पाडली या वेळी निवड झाल्या बदल सर्व सदस्य व सरपंच उपसरपंच यांचे स्वागत करण्यात आले यावेळी रांजणी / शिदेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच कु भाग्यश्री रोडगे उपसरपंच विष्णू करांडे तसेच सदस्य अर्चणा शेंद्रे उषा भावले . ज्योती मोटे . सागर सावंत ज्ञानेश्वर जाधव . विशाल ससाणे . शांताबाई पवार सर्व सदस्यांनचा सत्कार करण्यात आला व निवडीचा कार्यक्रम संपला आसे जाहीर करण्यात आले