आमदार सुरेश धस सह पत्नी व भावावर गुन्हा दाखल
राम खाडे यांनी याचिका केली होती,
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश....
माजलगाव वार्ताहार शेख अखिल शेख अजिज
आष्टी बीड तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपुर पांढरी खडकत खंडोबा देवस्थान बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान आष्टी चिखली चिंचपूर पिंपळेश्वर देवस्थानाच्या कथीत जमीन घोटाळ्याप्रकरणी आधी फौजदारी गुन्हा दाखल करा नंतर तपास करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता भाजपा आमदार सुरेश धस धसासह त्यांची पत्नी व बंधू सह अन्य दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय यांनी दिले तेव्हा काल उशिरा पर्यंत या सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आष्टी तालुक्यात व बीड जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे... या बाबतीत अधिक असे की बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानाच्या जमिनीची बेकायदेशीर हसतारणीचे आठ प्रकरणे समोर आले होते यामध्ये तालुक्यातील विठोबा देवस्थान मुर्शदपुर विठोबा देवस्थान पांढरी खडकत खंडोबा देवस्थान बेलगाव श्रीरामचंद्र देवस्थान आष्टी चिखली देवस्थान चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान यांचा समावेश होता त्यानंतर याचा तपास एस आयटी कडे सोपवण्यात आला होता मात्र एस आय टी ने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठ धाव घेतली व या याचिकेवर न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती अभय वाघ वसे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली सुनावणी दरम्यान याचिका कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले आहेत वर्क बोर्डाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाले मात्र हिंदू देवस्थानाच्या करीत नाहीत ते गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी केली या प्रकरणी सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात भाव घेतली मात्र धसाना त्या ठिकाणीही आधार मिळाला नाही आखिर दोन्ही बाजू युक्तिवाद केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आमदार सुरेश धस यांची याचिका फेटाळली आहे दरम्यान तक्रारदार राम खाडे यांची 13 जानेवारी 2022 रोजी ची तक्रार एफ आर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते त्यानुसार 29 रोजी कलम 13 ऑब्लिक एक अ. व .ब13. ऑब्लिक दोन भष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह कलम 420. 465 .467. 468 .471. 120.ब.109. भारतीय दंड सहित अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची तपास.एसीबीचे. उप अधीक्षक शंकर शिंदे हे करीत आहे