माजलगाव:--( प्रतिनिधी) भारतात प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे म्हणून ज्या संविधानाने प्रत्येक दबलेल्या, पिचलेल्या ,आदिवासी ,भटक्या, मुक्त ,वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम संविधान करीत असते संविधानाने दिलेल्या कलमा नुसार हक्क मिळतो .तेव्हा प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाचे हे कर्तव्य बनते की त्याने आपले हक्क अबाधित ठेवणाऱ्या संविधानाचे संरक्षण केले पाहिजे
कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य तेव्हाच टिकून राहते जेव्हा त्या देशातील प्रत्येक माणसाला न्याय मिळतो आणि हा न्याय मिळवून देण्याचे माध्यम भारतीय संविधान हे आहे असे प्रतिपादन स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय दादा साळवे यांनी 26 /11 /2022 शनिवार रोजी संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने बोलताना भीम नगर माजलगाव येथे केले पुढे बोलताना ते म्हणाले की या देशातील प्रत्येक माणसाला प्रत्येक वंचित घटकआला आदिवासीला भटक्यांना पारधी भिल्ल सर्व सर्व वंचित घटकांना संविधानामुळे अन्याय अत्याचारापासून मुक्तता भेटते परंतु यासार्वभौम भारत देशाचे दुर्दैव आहे की या सार्वभौम भारताच्या सार्वभौम संसदेच्या समोर 2018 स*** भारताचे संविधान भारताचा कायद्या काही समाजकंटकांनी जाळण्याचेपातक केलेली आहे परंतु त्या संविधानाला जाळण्याचे काम करणाऱ्या समाजद्रोही देशद्रोही माणसाला करोडो भारतीय मधून एकाही भारतीय ने अडविले नाही त्यावेळेस भारतीय लोकांची देशभक्ती कुठे जाते
26 /11 /1949 ला भारताने संविधान स्वीकारले आणि संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी भारताने लागू केले भारतातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला न्याय हक्क अधिकार मिळवून देणारा दिवस म्हणजे 26 /11 अर्थातच 26 नोव्हेंबर हा आहे परंतु काही मनुवादी नतदृष्ट लोकांनी 26 /11 म्हणजेच 26 नोव्हेंबर हा दिवस या देशातील वंचित घटकाला 18 पगड जातीच्या लोकांना हक्क मिळवून देणारा दिवस असूनही त्या 26 /11 ला काळा दिवस म्हणून प्रस्थापित करण्याचे काम केले आहे म्हणजे जेव्हा अठरापगड जातीच्या वंचित घटकांच्या लोकांना न्याय मिळतो हक्क मिळतात अधिकार मिळतात तो दिवस काळा कसा होऊ शकेल परंतु जाणून बुजून काही घटना या याच दिवशी कडून आणून त्या दिवसाला बदनाम करण्याचे काम काही लोकांनी केलेले आहे असेही स्वाभिमानी पाहिजे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे हे म्हणाले या संविधान गौरव कार्यक्रमां प्रसंगी माजलगाव नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती राजेश भाऊ साळवे कचरू तात्या खळगे ज्ञानोबा कांबळे प्रवीण ओव्हाळ ससाने शेकडो संविधान प्रेमी उपस्थित होते