खामगाव : (ज्ञानेश्वर पाटील जिल्हा प्रतनिधी)
यावेळी उपविभाग अधिकारी कार्यालया खामगाव समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या दोघांच्याही फोटोला चपला मारून नंतर दहन करण्यात आले. या दोघांच्याही विरोधात घोषणाबाजी व नारबाजी करण्यात आली तसेच एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह विविध घोषणानी परिसर दणाणून गेला.
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी व आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा जर ते निर्लज्जपणे या राज्यपाल पदाचा राजीनामा देत नसतील तर त्याना निष्काशीत करावे व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुध्दा छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक उदगार काढले आहेत, म्हणून या थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोशारी व सुधांशू त्रिवेदी दोन्हीही व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. समाधानकारक कार्यवाही न झाल्यास सकल मराठा समाज बांधव खामगाव च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.