बुलढाणा :(ज्ञानेश्वर पाटील)
भारत जोडो यात्रेचा बुलढाणा जिल्ह्यातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे. राहुल गांधी गुजरातला प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील निमखेडी येथे भारत जोडो यात्रेचा मुक्काम राहणार आहे. दोन दिवस राहुल गांधी यांचे मिशन गुजरात सुरु राहील. त्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा दाखल होतील.
खासदार राहुल गांधी याच्या भारत जोडो यात्रेला सगळीकडे दमदार प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेचा बुलढाणा जिल्ह्यातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे. आज ही यात्रा जळगाव जामोद वरून मध्यप्रदेशात मुक्कामी जाणार होती, मात्र आज यात्रेचा मुक्काम बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निमखेडी या गावातच असणार आहे. उद्या सकाळी राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या हेलिपॅडची उभारणी सुद्धा निमखेडी येथे करण्यात आली आहे. परवा २२ नोव्हेंबरला राहुल गांधी परतल्यानंतर यात्रा नियोजित मार्गाने मार्गस्थ होणार आहे.