माजलगावात ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर)जयंती उत्साहात साजरी.
मो.पैगंबरांचा संदेश आत्मसात करण्याचा मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना.
माजलगाव प्रतिनिधी ..
माजलगावात ईद-ए-मिलादुन्नबी जयंती शुक्रवार दि.29 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमस्थळी उपस्थित पाहुण्यांना शरबत, मोतीचुर लाडुचा प्रसाद वाटत करण्यात आला.दरम्यान यावेळी मान्यवरांनी मोहम्मद पैगंबर यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणा साठी दिलेला दिव्य संदेश आत्मसात करण्याच्या भावना व्यक्त केल्या.
जगभरात मुस्लिम धर्मियांकडून मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो.माजलगाव शहरात गणेश विसर्जनामुळे दि.28 रोजी असणारी जयंती सामाजिक सौदार्य दाखवत मुस्लिम बांधवांनी 29 रोजी साजरी केली.अहिले सुन्नत वल जमावत'कमिटीकडून आयोजित कार्यक्रमात याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे,जयंती कमिटीचे अध्यक्ष सय्यद सलीमबापू,ज्येष्ठ नेते दयानंदजी स्वामी,कॉ.मुस्तीकबाबा, माजी नगराध्यक्ष शेख मंजूर,माजी नगराध्यक्ष नासेर खान,पो.नि. शितलकुमार बल्लाळ,पो.नि. शिवाजी बंटेवाड,पत्रकार सुभाष नाकलगावकर,समाजवादीपार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल युवानेते बिलाल चाऊस,युवानेते शेख आसेफ,सययद समीर, अशोक लांडगेसर,माजी नगरसेवक सुशांत पौळ,माजी नगरसेवक राम गायकवाड,माजी नगरसेवक भागवत भोसले,नवनाथ धायजे, एमआयएमचे तालुका अध्यक्ष शे. इद्रिस पाशा,युवा तालुकाअध्यक्ष शमशू पठाण,शहराध्यक्ष शेख रशीद,बविमोचे राहुल मस्के,दीपक टाकणखार,राजू कुरेशी,शेख वसीम पोलीस कर्मचारी तळेकर,तोटेवाड, कुंवारे,कॉ.शे.याकूब,इत्यादींची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पैगंबरांचा समस्त मानवजातीसाठी असलेला संदेश आत्मसात करून त्यावर चालण्याच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम भोले, कॉ.सय्यद फारुखअण्णा यांनी केले तर आभार बविमो अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख फेरोज यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्या साठी रईस कादरी,युसुफ कादरी, शेख मेहबूब,सिराजोद्दीन,मुस्तकीन बाबा,शे.गुलाब यांच्यासह सर्व अहिले सुन्नत वल जमावत 'कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात परिसरातील मुस्लिम बांधवांसह इतरांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.