ऊसाची राहिलेली उचलीचे एक लाख 80 हजार रुपये मागणाऱ्या मुकादमास व महिलेला मारहाण
माजलगाव प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील एका ऊसतोड मुकादमाने व महिलेने राहिल्याने उचल एका ऊसतोड मजुराकडे गेल्यावर्षीचे राहिलेले एक लाख 80 हजार रुपये उचललेले उचल बाकी राहिलेले पैसे मागितल्या कारणाने चौघांनी संगणमत करून महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली तर त्यांच्यासोबत असलेल्या मुकादमाला नामे रवी अर्जुन राठोड वय 28 वर्ष आकाश अर्जुन राठोड वय 24 वर्ष संजय नामदेव राठोड वय 30 वर्ष अर्जुन दगडू राठोड वय 50 वर्ष या चारी आरोपीने संगणमत करून महिलाला व मुकादमाला डोक्यात काठीने मारून डोके फोडल्याची घटना घडली याबाबत माहिती मिळाली आहे की माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील रहिवासी असलेल्या एका ऊसतोड मंजूर महिलेचे त्याचं ठिकाणी असलेल्या ऊसतोड मंजूर संजय नामदेव राठोड यांच्याकडे गेल्या वर्षाची राहिलेले एक लाख 80 हजार रुपये उचलीचे पैसे बाकी राहिले होते ते मागण्यासाठी सदर महिला व मुकादम दि. 26. सप्टेंबर रोजी दुपारी 12:15 मि. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय नामदेव राठोड त्याच ठिकाणी राहणारी महिला व मुकादम नामे राजू गुलाब राठोड ला सोबत घेऊन यांच्या घरी गेले असता त्याचवेळी आरोपी 1)रवी अर्जुन राठोड वय 28 वर्ष 2) आकाश अर्जुन राठोड 24 वर्ष 3) संजय नामदेव राठोड वय 30 वर्ष 4) अर्जुन दगडू राठोड वय 50 वर्ष संजय नामदेव राठोड यांनी मुकादमास व महिलेस पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ करत सदर महिलेस लोखंडी तांबी मोटरसायकल चैन काठीने महिलेच्या हातावर मारून उजवा हात फ्रॅक्चर केला आहे तर तसेच मुकादम राजू गुलाब राठोड यांच्या डोक्यावर काठीने मारून डोके फोडून गंभीर जखमी केले आहे आणि जीव मारण्याच्या धमक्या दिल्या अशी फिर्याद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे आणि उल्लेखित नामे आरोपी विरोधात भादवि कलम 504, 324, 506, 34 प्रमाणे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.... माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याने या कलमांमध्ये 326 कलम हे का लावले नाही याचाही उत्तर पोलिस प्रशासन ने द्यावे या मारहाणी मध्ये महिलेचा उजवा हात निकामा झालेला आहे तरी पण माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासक हे आरोपीला पाठीशी का घालत आहे याचेही उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे जर पोलीस प्रशासनाने आरोपीला साथ दिली तर आरोपी हे यापुढे मोठा गुन्हा करू शकतात याला पोलीस प्रशासन जिम्मेदार राहिल का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.