मराठा मोर्चा वर पोलिसांचा लाठी चार्ज प्रचंड गदारोळ..
माजलगाव प्रतिनिधी.. जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जालन्यातून सुरू असलेला मराठा मोर्चा वर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे आंदोलकांना मागण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही वापर केला आहे गेल्या तीन दिवसापासून जालन्यातील सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते उपोषण आंदोलन चिघळु नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांना आंदोलकांनी विरोध केला त्यानंतर दोन्ही ही बाजूने रेटारेटी झाली त्यानंतर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप युक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती परंतु आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम होते दरम्यान आंदोलकांनी पोलिसावर दगडफेक केल्याने पोलिसांना आंदोलकावर लाठीचार्ज करावा लागला असे पोलिसांनी म्हटले आहे दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे जखमी झालेल्या पोलिसाला दवाखान्यात नेण्यात आलेले आहे