देपेगाव येथील शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या : नुमान चाऊस
फाशी घेऊन आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नसल्याचे चिठ्ठीमध्ये उल्लेख
माजलगाव, प्रतिनिधी.
तालुक्यातील देपेगाव येथील 52 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कापसाला भाव नसल्याने व खाजगी सावकारांकडून सततच्या तागड्यामुळे कंटाळून दोन दिवसांपूर्वी भावाच्या शेतात झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट सुद्धा आढळली आहे. तरी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबास तात्काळ ₹15 लाखाची आर्थिक मदत सरकारने द्यावी व शेतमालाला भाव द्यावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे. शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतात कापूस लावलेला होता परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांचा कापूस पडून होता. सावकारांनी त्यांच्या मागे तागडा लावलेला होता व त्यास कंटाळून या शेतकऱ्याने भावाच्या शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. असे त्यांच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोट मध्ये सुद्धा उल्लेखित आहे. तरी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास तात्काळ 15 लाख रुपयांचे आर्थिक मदत राज्य शासनाने द्यावी व कापसाला, कांद्याला व इतर शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ई-मेलद्वारे मागणी केली आहे.