पेठ बीड पोलिसांनी आत्महत्येचा बनाव उघडा पाडला,
बीडमध्ये ओढणीने महिलेचा गळा आवळून विवाहितेचा खून..
माजलगाव प्रतिनिधी.. कौटुंबिक वादातून विवाहितेच्या ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनुस पार्क परिसरात पत्ती विरुद्ध खुना चा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर पतनीने गळा फास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला मयत विवाहित तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील मुस्कान हिचा विवाह 15 महिन्यापूर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील शेख शाहेद रुकमोदिन यांच्यासोबत झाला होता पात्रुड येथे राहात असताना नेहमी वाद होत होता त्यामुळे मुस्कानच्या वडिलांनी त्याला बीडमध्ये आणले होते त्यानंतर 4ते 5 दिवसांनी जावई शेख शाहेद हा देखील बीडमध्ये आला मुस्कान आणि शाहेद हे दोघेही पेठ बीड हद्दीतील युनुस पार्क येथे रूम करून किरायाने राहत होते दि.5 एप्रिल रोजी मुस्कान आणि तिचा पती मध्ये पात्रुड येथील सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला त्यानंतर दि.6 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता शेख शाहेद यांनी मुस्कान च्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत बिघडलेली आहे असे सांगून आणि तोंडातून फेस येत असल्याचे सांगितले मुस्कान च्या वडिलांनी व तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तिथे धाव घेतली असता मुस्कान गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली तिला तात्काळ बीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुस्कान हिला मयत घोषित केले मुस्कानच्या दंडावर पायावर आणि हातावर जखमा आढळल्या असून तिचा उजव्या गालाजवळ नक लागल्यासारखे दिसून आले यावरून जावई शेख शाहेद यांनीच मुस्कानला ओढणीने गळा आवळून जीव मारले व आत्महत्या चा बनाव केला या प्रकरणात मयत विवाहितेचे वडील शेख जमील शेख खय्युम रा. तेलगाव नाका बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख शाहेद यांच्याविरोधक कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.